गणाधीश शाळेत इतिहास प्रदर्शन, आनंदमेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:28 PM2019-12-27T22:28:15+5:302019-12-27T22:29:06+5:30
येवला तालुक्यातील राजापूर येथील स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था संचलित गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व गणाधीश आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे किसान दिन, इतिहास प्रदर्शन व आनंदमेळा उत्साहात झाला.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था संचलित गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व गणाधीश आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे किसान दिन, इतिहास प्रदर्शन व आनंदमेळा उत्साहात झाला.
संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, हवालदार ज्ञानेश्वर वºहे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विजय सानप, दीपक उगले, अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयाच्या मुख्याध्यापक जयश्री सरोदे, आनंद महाराज कॉलेजच्या भालेराव, प्राचार्य प्रशांत बोडके, सुरेश धात्रक उपस्थित होते.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. यानंतर बहारदार नृत्याविष्कारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शेतकरी छोट्या झोपडीत आपला संसार कसा थाटतो व कशा प्रकारे जीवन जगतो याचा देखावा यावेळी दाखविण्यात आला. तसेच इतिहास प्रदर्शनात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारली होती. तसेच आनंदमेळ्यातू व्यावहारिक ज्ञान व पाककलेची माहिती मिळावी यासाठी विविध खाण्याच्या वस्तूंचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. रंजना वाघ व हर्षदा मुंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्नेहलता गहिरे यांनी आभार मानले.