प्रात्याक्षिक हायड्रोलिक वाहनाचे अन‌् प्रत्यक्षात रस्त्यांवर मालट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:14+5:302021-07-08T04:12:14+5:30

पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि.६) कारवाईचे प्रात्यक्षिक आयुक्तालयात दाखविण्यात आले; मात्र ...

Demonstration hydraulic vehicle and actually truck on the road | प्रात्याक्षिक हायड्रोलिक वाहनाचे अन‌् प्रत्यक्षात रस्त्यांवर मालट्रक

प्रात्याक्षिक हायड्रोलिक वाहनाचे अन‌् प्रत्यक्षात रस्त्यांवर मालट्रक

Next

पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि.६) कारवाईचे प्रात्यक्षिक आयुक्तालयात दाखविण्यात आले; मात्र प्रात्याक्षिकांमध्ये जे दाखविले त्या सर्व कार्यपध्दतीला पहिल्याच दिवशी संबंधितांकडून हरताळ फासला गेला. बुधवारी शहरात नो-पार्किंगमधी वाहनांवर टोइंग कारवाई करण्याअगोदर तीन मिनिटांऐवजी कमी वेळ प्रतीक्षा करत वाहने उचलून मालट्रकमध्ये भरण्यावरच ठेकेदाराची माणसे भर देताना दिसून आली. तसेच वाहनावर नेमलेले वाहतुक पोलीस केवळ कॅबीनमध्येच बसून राहत ‘ आमच्या पाठीला डोळेच नाही’ असे म्हणत ट्रकच्या मागे घडणाऱ्या बाबींकडे कानाडोळा करताना पहावयास मिळाले. वाहन उचलताना वाहन चालक हजर झाल्यास शासकिय शुल्क घेऊन त्यास त्याचे वाहन जागेवर देणे पोलीस प्रशासनाने बंधनकारक केलेले असतानाही संबंधितांकडून मात्र या अटीला तीलांजली दिली जात होती.

--इन्फो--

वाहनाला ब्रेक लागताच उचलेगीरीसाठी उड्या

शहर वाहतुक पोलीस टोइंग व्हॅनच्या कॅबीनमधून पीए सिस्टिमवरून संबंधित वाहनाच्या क्रमांकाचा पुकारा करत वाहन टोइंग केले जाणार असल्याची पुर्वकल्पना देत नाही तोच मालट्रकमधील तरुण कामगार खाली उड्या घेत नो-पार्किंगमधील वाहने उचलून ट्रकमध्ये बेदरकारपणे टाकताना दिसून आले. मुळात तीन मिनिटे वाट बघितल्यानंतर वाहने उचलणे बंधकारक असल्याचे कार्यपध्दतीच्य अटी-शर्थींमध्ये म्हटले आहे. याचा विसर संबंधितांना पडल्याने नाशिककरांनी संताप व्यक्त केला.

070721\07nsk_43_07072021_13.jpg~070721\07nsk_44_07072021_13.jpg~070721\07nsk_45_07072021_13.jpg

टोइंगचा वाद पोलीसांची डोकेदुखी~टोइंगचा वाद पोलीसांची डोकेदुखी~टोइंगचा वाद पोलीसांची डोकेदुखी

Web Title: Demonstration hydraulic vehicle and actually truck on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.