मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:29 PM2019-10-16T18:29:27+5:302019-10-16T18:29:50+5:30
खडक माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पणती बनविण्याचे साहित्य देऊन प्रत्यक्ष कृती करून पणत्या तयार करून घेतल्या.
सायखेडा : खडक माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पणती बनविण्याचे साहित्य देऊन प्रत्यक्ष कृती करून पणत्या तयार करून घेतल्या. आनंददायी शिक्षण अभ्यासक्र म अंतर्गत कार्यानुभव विषयांतर्गत दप्तरमुक्त शनिवारनिमित्त शालेय पटांगणात पणत्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिक्षक देवांदन शेलेकर आणि संदीप भाबड यांनी पणती तयार करण्याची कृती करून दाखविली, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वत: पणत्या तयार केल्या.
यावेळी मुख्याध्यापक लचके, उपशिक्षक सोनवणे, गाढे, पाटील, शेलेकर, शेटे, बागडे, ब्राह्मणकर, भाबड, रसाळ उपस्थित होते.