डी जे चालकांवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नाशकात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 04:13 PM2020-01-18T16:13:24+5:302020-01-18T16:19:18+5:30
डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)र्विविध संघटनांंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)र्विविध संघटनांंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांचा जयजयकार करीत आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
मातोरीतील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपींना अधिकाधिक कठोर शिक्षा करून समाजातील दुर्बल, दलीत व वंचित घटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी यासह ग्रामीण भागातील फार्म हाउसवर अवैधरित्या चालू असणाºया पाटर्यावर निर्बध आणन्यासाठी पोलिसांनी यंत्रणा उभी करुन फार्म हाउसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावे, अत्याचार पीडित तरुण आर्थिकदुष्टया कमकुवत असून त्यांना समाजकल्याण विभागामार्फत आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने शिफारस शासनाकडे करावी, अशा मागण्या नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चातून केली आहे. गोल्फ क्लब येथून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी हमको चाहीये गुंडागिरीसे आझादी, गुंडगिरी थांबली पाहिजे यांचा जयघोष केला. गोल्फ क्लब येथून निगालेला हा मोर्चा त्र्यंबकनाका, अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल मार्गे शालिमारवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर मोर्चातील प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मानवतेला काळीमा फासणाºया मातोरी येथील मारहाण प्रकरणातील आरोपीतांना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. तर माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सत्यभामा गाडेकर, वत्सला खैरे, कविता कर्डक यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात सर्वांनी संघटीत लढा देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शिवसेना शहराध्यक्ष महेश बडवे, भाकपचे राज्य सचीव राजू देसले, तानाजी जायभावे, राहूल दिवे, जगदीश पवार, दीपक डोके, सुरेश मारू, बिपीन कटारे, नीलेश उन्हवणे, नवीन नन्नावरे, प्रतीक सोनटक्के, योगेश नन्नवरे लता खामकर, अनिल मकवाना, उषा पेडणेकर, उषा जाधव, किरण मोहिते, आशा तडवी, आदीसह पीडित तरुणांचे आई-वडील, काका, मावशी मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, अन्याय निवारण संघर्ष समितीकडून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सकाळपासूनच चोख बंदोबस्थ ठेवला होता