अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  महापालिकेसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:23 AM2018-10-20T01:23:33+5:302018-10-20T01:23:58+5:30

नाशिक महापालिकेने बंद केलेल्या अंगणवाड्या त्वरित सुरू कराव्यात तसेच ४१३ अंगणवाड्यांचे मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले.

 Demonstration Movement of Anganwadi employees in front of municipal corporation | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  महापालिकेसमोर धरणे आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  महापालिकेसमोर धरणे आंदोलन

googlenewsNext

नाशिक : नाशिक महापालिकेने बंद केलेल्या अंगणवाड्या त्वरित सुरू कराव्यात तसेच ४१३ अंगणवाड्यांचे मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले.  महापालिकेने ४१३ अंगणवाड्यांचे मानधन अडवून ठेवले असून, १३६ अंगणवाड्यांना पटसंख्येचे कारण दाखवून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत नाशिक महापालिकेच्या महासभेने अंगणवाडी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परंतु महासभेचा निर्णय होऊनही प्रशासन हुकूमशाही करीत असल्याच्या निषेधार्थ शेकडो अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. महासभा सुरू असेपर्यंत आंदोलन सुरूच होते.

Web Title:  Demonstration Movement of Anganwadi employees in front of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.