समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:16 PM2017-08-10T23:16:25+5:302017-08-11T00:17:46+5:30

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.

Demonstration of prosperity affected farmers | समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

Next

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.
समृद्धीबाधित दहा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतील शेतकरी मुंबई येथे गुरुवारी (दि. १०) मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या दहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून समृद्धीबाधित गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृद्धी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या. समृद्धी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृद्धी महामार्ग रद्द करा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा’, अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिकारी शासनाची दिशाभूल करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी केला. पर्यायी मार्ग असताना शासन आडमुठे धोरण घेत असून, यामुळे बागायती क्षेत्रासह अनेक शेतकºयांच्या घरावर नांगर फिरणार असल्याने शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी अंबादास वाजे यांनी केली. शेतकºयांनी एकजूट दाखवून यापुढेही लढा सुरू ठेवावा, असे आवाहन वाजे यांनी केले. राधेश्याम मोपलवार यांनी शेतकºयांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी तानाजी तुपे यांनी केली. सदर प्रकल्प म्हणजे हत्ती असून, तो पोसणे अवघड असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती शांताराम ढोकणे यांनी व्यक्त केले. या महामार्गातून बागायती क्षेत्र टाळावे व पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नामदेव आरोटे, भाऊसाहेब कराड, रत्ना पवार, विमल सातपुते, शीलाबाई पडवळ, रावसाहेब हारक, उत्तम हारक, ज्ञानेश्वर चव्हाणके, दशरथ तांबे, विष्णू सांगळे, रंगनाथ ढोली, पांडुरंग बोडके, विनोद पडवळ, ज्ञानेश्वर काळुंगे, आनंदा काळुंखे, संजय वाजे, दशरथ ढोली, योगेश तांबे, विलास आढाव, विजय दराडे, किरण हारक, संजय वाजे, नवनाथ ढोली, सोपान वाजे, अमोल वाजे, संतोष बर्वे, घमाजी ढोली यांच्यासह सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, दुसंगवाडी, पाथरे, मलढोण, मºहळ, डुबेरे, पाटोळे आदिंसह समृद्धीबाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, दत्तात्रय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.

Web Title: Demonstration of prosperity affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.