घोटीत दंगा काबू योजना प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 10:54 PM2021-09-08T22:54:28+5:302021-09-08T22:55:14+5:30
घोटी : सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने घोटी गावातून परेड घेऊन घोटीच्या मध्यवर्ती ठिकाणी जैन मंदिर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड व प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला होता. तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती उत्सव आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवर पूर्णत: बंदी असून कुठल्याही प्रकारच्या स्थानिक उत्सवास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.

घोटी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गर्दी न करता एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उत्सवास परवानगी घ्यावी. पोलीस ठाण्यातून सार्वजनिक उत्सवास परवानगी नसल्याचे या ठिकाणी प्रकर्षाने सांगण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव राबविताना ४ फूट उंचीच्याच मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्यात यावी. घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त नसावी. गणपती उत्सव आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर पूर्णत: बंदी असून कुठल्याही प्रकारच्या स्थानिक उत्सवास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. याविषयी आखणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे घोटी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले. दरम्यान, घोटी शहरातून परेड काढण्यात आली.