बोरा एज्युकेशन सोसायटीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:51 PM2019-12-22T14:51:20+5:302019-12-22T14:52:39+5:30

वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

Demonstration of science and technology at the Bora Education Society | बोरा एज्युकेशन सोसायटीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

बोरा एज्युकेशन सोसायटीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Next
ठळक मुद्दे४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किसनलाल बोरा, भौतिकशास्त्र तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सर्व विज्ञानप्रेमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (९ वी ते १२ वी) अशा दोन गटात झाले. शिक्षंकासाठी प्राथमिक शिक्षक (१ ली ते ८ वी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक (९ वी ते १२ वी) असे दोन गट तर प्रयोगशाळा परिचर यांचा स्वतंत्र गट होता.
दरम्यान विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असून उपविषय शाश्वत कृषी पद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक विकास, भविष्यकालीन परिवहन, संचार व शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळवे यांनी दिली.
या प्रदर्शनामूळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यास मदत होईल असे मत संस्थेचे चेअरमन महेंद्र बोरा यांनी व्यक्त केले. जनरल सेक्र ेटरी अलकेश खाबिया, व्हाईस चेअरमन मुलचंद बाफणा, संचालक किशोर बोरा, सुनिल समदडीया, गितेश बोरा, दिपक पारीक, प्रकाश खाबीया, मनोज बोथरा व मान्यवार उपस्थित होते.
समारोप व बक्षीस वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती कैलास पाटील होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, पंचायत समिती सदस्य एकनाथ गायकवाड, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, उपसरपंच मनोज शर्मा, संतोष कथार, गटशिक्षणाधिकारी डी. बी. कनोज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यु. टी. बोरसे, जे. व्ही. ठोके, एम. के. चौरे, ए. व्ही. रौदळ, व्ही. व्ही. सानप, प्रल्हाद खांबेकर होते.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी रु पाली पगार, श्रीमती एस. डी. अहिरे, सौ. एस. एस. घोलप, श्रीमती एम. एस. कोष्टी, के. पी. सोनार, सी. बी. गवळी, के. के. आहिरे, डी. य.ु आहिरे, ए. डी. काळे, किसन पवार, किशोर बोरा, मार्कस साळवे, प्रितम पाठे, लता शेवाळे, प्रकाश खैरनार आदींनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन विस्तारअधिकारी एस. पी. पगार व दीप्ती रोकडे यांनी केले. तर आभार डी. जी. वाणी यांनी मानले.
या प्रदर्शनात प्राथमीक शाळा - १०३, माध्यमिक शाळा - ५६, प्राथमीक शिक्षक गट - २८, माध्यमिक शिक्षक गट - १०, लॅब असिस्टंट - ३, आणि व्यवसाय मार्गदर्शन - ४ अश्या २०४ शाळांचा सहभाग होता.
 

Web Title: Demonstration of science and technology at the Bora Education Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.