कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:42 AM2018-11-02T01:42:47+5:302018-11-02T01:43:48+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महालक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना महिला.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कारागृहात सुतार, लोहार, रसायन, टेलिरंग, विणकाम, बेकरी, मूर्ती बनविणे आदी नऊ प्रकारचे कारखाने आहेत. कैद्यांनी पैठणी, गिफ्टच्या वस्तू, गणेशमूर्ती, स्वामी समर्थ मूर्ती, वाल हॅँगिग, फ्लॉवर पॉट्स सागवानी लाकडाच्या खुर्च्या, सागवानी पोळपाट, लाटणे, सोफासेट, टीपॉय, खादीचे कपडे, चपला, लेदरचे बेल्टस आदी वस्तू बनविल्या असून, कारागृहाच्या प्रवेशद्वारावरील स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवल्या आहेत. दर्जेदार, टिकाऊ व कमी किमतीत असणाऱ्या या विविध वस्तूंना मोठी मागणी असते.
दिवाळीनिमित्त बनविलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे गुरुवारी सकाळी सिनेअभिनेत्री स्मिता प्रभू, अभिनेता अमोल थोरात, कथ्थक नृत्यांगना मानसी पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधीक्षक राजेंद्रकुमार साळी, संजीवनी साळी, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर, यशवंत फड, एस. ए. गिते, एस. आर. गायकवाड, एस. एच. आढे आदी उपस्थित होते.