दिंडोरीत माकपाच्या वतीने निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:31 AM2019-12-21T00:31:48+5:302019-12-21T00:32:26+5:30
केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले.
दिंडोरी : केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले.
दिंडोरी येथील रामेश्वरी मंदिरापासून मोर्चाला सुरु वात झाली. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठी होती. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित मोर्चेकऱ्यांना सुनील मालुसरे, रमेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
शासनाने पारित केलेले विधेयक मागे घेत संविधानाचा आदर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माकपाचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.