घरेलू कामगार  संघटनेच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:51 PM2017-12-20T23:51:55+5:302017-12-21T00:30:03+5:30

बंद केलेले कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी सीटू प्रणीत महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.

Demonstrations on behalf of the domestic workers' union | घरेलू कामगार  संघटनेच्या वतीने निदर्शने

घरेलू कामगार  संघटनेच्या वतीने निदर्शने

Next

सातपूर : बंद केलेले कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी सीटू प्रणीत महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.  राज्यात सत्ता बदल झाल्यापासून घरकामगारांना मिळणाºया लाभात मोठ्या प्रमाणात घसरण होत गेली. त्यातच सरकारने कल्याणकारी मंडळ बरखास्त करून विकास आयुक्तांची नेमणूक केली. या निवेदनात म्हटले की, घरकामगार कल्याणकारी मंडळाची पुन्हा स्थापना करावी, जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरकामगार मंडळ स्थापन करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात घरकामगारांची नोंदणी, नूतनीकरण, ओळखपत्र वाटप व लाभ पोहोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, नोंदणीकक्ष व लाभ मिळविण्यासाठीची वयोमर्यादा वाढवून ७० वर्षापर्यंत लाभ द्यावा, ५५ वर्ष झालेल्या घरकामगारांना त्वरित सन्मान धन द्यावे, घरकामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी भरीव शिष्यवृत्ती देण्यात यावी, आरोग्य व आयुर्विमा, मातृत्व लाभासाठी मासिक तीन हजार रु पये पेन्शन मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सिंधू शार्दुल, अ‍ॅड. वसुधा कराड, मोहन जाधव, मंगला पाटील, विजया टिक्कल, राजूबाई मुंढे, देवीदास आडे, तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे, संजय पवार, दिनेश सातभाई आदींसह घरकामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  घरकामगारांना कल्याणकारी लाभ मिळणेच बंद झाले आहे. बंद केलेल्या कल्याणकारी मंडळासह विविध मागण्यांसाठी सीटू प्रणीत महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Demonstrations on behalf of the domestic workers' union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक