शिवसेनेच्या वतीने निदर्शने
By admin | Published: October 7, 2016 11:56 PM2016-10-07T23:56:33+5:302016-10-08T00:04:10+5:30
मनमाड : निरुपम, केजरीवाल, चिदंबरम यांच्या वक्तव्याने संताप
मनमाड : कॉँग्रेसचे संजय निरूपम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मनमाड येथे उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज सायंकाळी तिघांच्या प्रतिमेला चपलांचा मार देऊन निदर्शने केली. देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,
अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नुकतेच भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सजिकल आॅपरेशनमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असताना संजय निरूपम, अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम यांनी याबाबद वादग्रस्त विधाने करून नवा वाद निर्माण केला आहे. या विधानांच्या विरोधात संतप्त झालेल्या मनमाड येथील शिवसैनिकांनी शिवाजी चौकात निदर्शने करून या तिघांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्यानंतर चपलांनी मार देण्यात आला, काळी शाई टाकून फोटोला काळे फासण्यात आले व नंतर दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपप्रमुख जाफर मिर्झा यांनी भाषणातून निषेध व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, दिलीप भाबड, विनय अहेर, रमेश हिरण, गोविंद रसाळ, संजय कटारिया, सुनील गवळी, अॅड. सुधाकर मोेरे, विनय अहेर,
अनिल दराडे, अतुल भंडारी, नितीन पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)