सफाई कर्मचाºयांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:58 AM2017-10-14T00:58:31+5:302017-10-14T00:58:38+5:30
इगतपुरीत सफाई कर्मचाºयांना दिवाळी बोनस व वाढीव पगार मिळावा याकरिता कामगारांकडून वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. शुक्रवारी सीटू संघटना संलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
घोटी : इगतपुरीत सफाई कर्मचाºयांना दिवाळी बोनस व वाढीव पगार मिळावा याकरिता कामगारांकडून वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. शुक्रवारी सीटू संघटना संलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरपालिका कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जीनवाल, सदानंद शेळके, कृष्णा गायकवाड, बांधकाम कामगार अध्यक्ष कांतीलाल गरुड, दत्ता राक्षे, राजकुमार बैद, संतोष गायकवाड, संतोष तुपे, प्रीती जीनवाल, अनिता ढकोलिया, प्रमिला चरण, माया राठी, कोयना अवघडे, शोभा तुपे, पुष्पा देवकुळे, सरोज बैद, ताराबाई डावखर, लता शिंदे आदी उपस्थित होते.
बोनस व पगारासाठी सीटू संघटनेचे देवीदास आडोळे व बांधकाम कामगार संघटनेचे कांतीलाल गरुड, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जीनवाल, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद शेळके, कृष्णा गायकवाड या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांची कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सफाई कर्मचाºयांच्या वाढीव पगार व दिवाळी बोनसबाबत शासन निर्णय परिपत्रक अद्याप आले नाही व याबाबत मी निर्णय घेऊन निधी उपलब्ध करू शकत नाही जर काही दिवसात शासन निर्णय झाला तर पगारवाढ किंवा पगार, बोनस देण्यात येईल.