शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:49 PM2017-10-05T16:49:46+5:302017-10-05T16:51:30+5:30

Demonstrations for the demand for reinstatement of city baf | शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

Next


नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्याचे कारण देत कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी सिटू, आयटक, छात्रभारती आदि विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विभागीय नियंत्रक यामिनी जोशी दौºयावर असल्याने सहायक पाटोळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. तोट्याचे कारण देत नाशिक आगाराकडून २७४ पैकी १४५ बसफेºया बंद करण्यात आल्या असून, यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांचे मोठे हाल होत असून, खासगी वाहनांमधून नाईलाजास्तव जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने नफा-तोट्याचे गणित जाहीर करावे, या संदर्भात शासनाच्या विविध खात्यांसोबत झालेला पत्रव्यवहार खुला करावा, महामंडळ सांगत असलेला तोटा कमी करण्यासाठी नाशिक आगाराने काय प्रयत्न केले ते जनतेला सांगावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Demonstrations for the demand for reinstatement of city baf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.