ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांग वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:35 PM2021-08-02T17:35:42+5:302021-08-02T17:39:05+5:30
ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
नाशिक : ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. नाशिकरोड भागातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.२) ब्रम्हगीरी बचाव मोहीमेला पाठबळ देण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी ब्रह्मगिरी पर्वत रांगा, नैसर्गिक पुरातन वास्तू , गडकोट किल्ले पर्वत यांचे परी संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित होऊन त्याचे सीमांकन करावे या मागणीकरिता जनजागृती करण्यात आली. जैवविविधतेचे संरक्षण हेच पृथ्वीचे संरक्षण आ, हे धोरण अवलंबून अवैध उत्खनन, अवैध नागरी वस्ती, नियोजनशून्य बांधकामाच्या विळखातून निसर्गाला वाचवण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून जैवविविधतेचे संरक्षण व संरक्षित जागा दुसऱ्या कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी विकासकांना देण्याच्या विरोधात, तसेच नाशिक चुंचाळे येथील श्री पंचवटी पंजारपोळ संस्थेची जमीन सिडको प्रकल्पाला हस्तांतरित करण्याविरोधात यावेळी निदर्शने करण्यात आले.या जनजागृती मोहीमेत नाशिकरोड मधील पर्यावरण कार्यकर्ते उदय थोरात, संदिप नागरे, नंदकिशोर गायकवाड, राहुल बोराडे, शिरिष कावळे, विजय देशमुख, विनोद नाजरे, अनिल व्यवहारे, सुजाता जोशी, तेजस पाठक, प्रकाश लोंढे, संजय कोल्हे आदी पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवविण्यात ब्रम्हगीरी बचाव मोहीमेंतर्गत निदर्शनेही केली.