सिटू युनियनच्या नेतृत्वाखाली निदर्शने
By admin | Published: October 28, 2016 12:24 AM2016-10-28T00:24:36+5:302016-10-28T00:34:13+5:30
सिटू युनियनच्या नेतृत्वाखाली निदर्शने
सातपूर : विविध उद्योग आणि आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या हंगामी, कंत्राटी, प्रशिक्षणार्थी, मानधनावरील कामगारांना बोनस मिळावा या मागणीसाठी सिटू युनियनच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सिटूसह अन्य कामगार संघटनांच्या देशव्यापी संपामुळे केंद्र सरकारला कामगार कायद्यात बदल करावा लागला आहे. नव्या बदलानुसार ८.३३ ते २० टक्केपर्यंत बोनस किंवा किमान सात हजार रु पये कामगारांना मिळाला पाहिजे, परंतु बहुसंख्य उद्योग, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एसटी महामंडळ, वीजनिर्मिती, परिवहन कंपनी यातील कंत्राटी कामगारांना नमूद कायद्यानुसार बोनस दिलेला नाही. ठेकेदारांच्या दादागिरीमुळे बोनस दिला जात नाही. याची चौकशी व्हावी, बोनस न देणाऱ्या ठेकेदारांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी कामगार उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीसाठी सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली. (वार्ताहर)