महाराष्ट राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:49 AM2018-03-17T00:49:36+5:302018-03-17T00:49:36+5:30

सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा राखीव ठेवणे, राज्य व केंद्राप्रमाणेच वेतन आणि भत्ते, वैद्यकीय अधिकारी यांची सुरक्षा व प्रस्तावित एनएमसी बिलास विरोध आदी मागण्या मांडण्यासाठी महाराष्टÑ राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे शुक्रवारी (दि. १६) जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Demonstrations by Maharashtra Gazetted Medical Officer Association | महाराष्ट राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे निदर्शने

महाराष्ट राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे निदर्शने

Next

नाशिक : सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा राखीव ठेवणे, राज्य व केंद्राप्रमाणेच वेतन आणि भत्ते, वैद्यकीय अधिकारी यांची सुरक्षा व प्रस्तावित एनएमसी बिलास विरोध आदी मागण्या मांडण्यासाठी महाराष्टÑ राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे शुक्रवारी (दि. १६) जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या सर्व सदस्यांनी काळ्या फिती लावून व शासनाच्या पत्रकाचे वाचन करून निषेध व्यक्त केला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. याप्रसंगी डॉ. अरविंद माहुलकर, डॉ. युवराज देवरे, डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. मोहन बच्छाव, डॉ. माधव अहिरे, डॉ. सुधीर पाटील, डॉ. महेंद्र देवळीकर, डॉ. नवलसिंग चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर चकोर, डॉ. मनीषा भालेराव, डॉ. टी. सी. चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations by Maharashtra Gazetted Medical Officer Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर