बाजार समित्या सुरू करण्यासाठी सटाण्यात महाविकास आघाडीचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:33 PM2021-04-01T22:33:59+5:302021-04-02T01:05:47+5:30
सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली .
सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली .
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत . यामुळे शेतमालचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांची कोंडी झाली आहे. बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा विक्री करता आला नाही . परिणामी हातात पैसा नसल्यामुळे मार्च अखेरीसचे व्यवहार पूर्ण करता आले नाही . वीज बिले देखील भरता आले नाही . तसेच विक्रीसाठी शेतात काढून ठेवलेला कांदा प्रचंड उन्हामुळे खराब होत आहे. अशा कोंडीत सापलेल्या शेतकर्याला मुक्त करण्यासाठी शासनाने तत्काळ बाजार लिलाव सुरू करावेत या मागणीसाठी आज गुरुवारी (दि.1)येथील तहसील कार्यालयासमोर कोंग्रेसचे शराध्यक्ष किशोर कदम ,राष्ट्रवादी कोंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे ,माजी शहरप्रमुख शरद शेवाळे यांनी गळ्यात कांदा माळ घालून तहसील कार्यालयासमोर चालू करा ,चालू करा ,बाजार समित्या चालू करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनाची दखल घेत तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सटाणा व नामपुर बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधून 5 एप्रिल पासून शेतमालचे लिलाव सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
फोटो कप्शन ; कांदा लिलावासाठी बाजार समित्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सटाणा येथील तहसील आवारात कांद्याच्या माळा घालून निदर्शने करतांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी