गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनी येवल्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:48 PM2020-02-22T22:48:33+5:302020-02-23T00:24:31+5:30
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. पाच वर्षांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी येवला तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केले.
येवला : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा पाच वर्षांपूर्वी गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. पाच वर्षांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी येवला तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केले.
‘कॉ. पानसरे यांच्या खुन्यांना अटक करा’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश, कुलगुरु डॉ. कलबुर्गी अमर रहे’, ‘हम सब एक है’ आदी घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले होते. आंदोलनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अजय विभांडिक, प्रा. डॉ. मनोहर पाचोरे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, किरण जाधव, सुधा पाटील, दिनकर दाणे, कविता झाल्टे, रिमा बोरसे आदी सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार रोहिदास वारूळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.