नर्मदा बचाव समर्थनार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:36 AM2017-08-09T00:36:40+5:302017-08-09T00:36:51+5:30
मध्य प्रदेश सरकारने नर्मदा बचाव आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मेधा पाटकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नर्मदा बचाव आंदोलन समर्थन समितीने गाडगे महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
नाशिक : मध्य प्रदेश सरकारने नर्मदा बचाव आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मेधा पाटकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नर्मदा बचाव आंदोलन समर्थन समितीने गाडगे महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
सरदार सरोवर धरणाचे दरवाजे बंद करण्याच्या मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाला बसलेले असताना मध्य प्रदेश सरकारने लाठीमार करून आंदोलकांना अटक केली. या अटकेचा व दडपशाहीचा नर्मदा बचाव आंदोलन समर्थन समितीने निषेध केला असून, मध्य प्रदेश सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी निषेध सभा घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात छाया देव, श्रीधर देशपांडे, कॉ. राजू देसले, हिंद मजदूर सभा, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मानव अधिकार संवर्धन संघटन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.