राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे भागवत विरोधात नाशिकमध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:00 PM2018-02-14T15:00:44+5:302018-02-14T15:02:00+5:30
नाशिक : भारतीय लष्करावर केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी यासाठी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
‘लष्कराचा अपमान करणाºया भागवताचा धिक्कार असो, माफी मागा, माफी मागा’ असे फलक हातात घेवून जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. देशाासाठी लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास अवघ्या तीन दिवसात लष्कर उभारण्याची क्षमता राष्टÑीय स्वयंसेवक संघात आहे. लष्कराला जवान तयार करण्यास ६ ते ७ महिने लागतात तेच काम संघ महिनाभरात करेल असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य भारतीय जवानांचे अपमान करणारे असल्याचा आरोप करीत करण्यात आलेल्या या आंदोलनात भागवत यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. ‘आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन, शिपाई होईन, ऐटीत चालीन’ या बालकवितेसारखे वक्तव्य संघचालक मोहन भागवत करीत असल्याची टिका शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. या आंदोलनात अॅड. चिन्मय गाढे, योगेश निसाळ, अमोल आव्हाड, शिवराज ओबेरॉय, रोहन नाहिरे, विशाल कोशिरे, किरण मानके, दीपक पाटील, डॉ. संदीप चव्हाण, विशाल तायडे, निलेश क र्डक, सचिन बिडकर, प्रफुल्ल पाटील, संतोष भुजबळ, भुषण गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.