घरेलू महिला कामगारांची प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:24 AM2018-06-19T00:24:00+5:302018-06-19T00:24:22+5:30
घरेलू कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सीटू संलग्न संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना निवेदन देण्यात आले.
सातपूर : घरेलू कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सीटू संलग्न संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना निवेदन देण्यात आले. घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थींची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, आरोग्य विमा, पेन्शन योजना लागू करावी, फंड, ग्रॅच्युईटी, साप्ताहिक सुटी, घरेलू कामगारांची नोंदणी व नूतनीकरण, ओळखपत्र, आजारपणाची रजा, घरेलू कामगाराची वयोमर्यादा वय वर्ष ७० असणाºयांना लाभ देण्यात यावा.या मागण्यांसाठी सोमवारी (दि.१८) कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या सरचिटणीस सिंधू शार्दुल, वसुधा कराड, मोहन जाधव, मंगला पाटील, विजया टीक्कल, कल्पना शिंदे, संजय पवार आदींसह पदाधिकारी व घरेलू महिला कामगार उपस्थित होत्या. घर कामगार मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, किमान वेतन, आठवड्यातून एक दिवस पगारी सुटी, दिवाळी बोनस द्यावा, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोफत घरे देण्यात यावीत. किमान वेतनासह कामगार कायदे लागू करावेत यांसह सुविधा लागू कराव्यात.