सक्तीच्या वसुलीविरोधात दात्याणेत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:20 AM2019-07-07T01:20:17+5:302019-07-07T01:22:09+5:30

कसबे-सुकेणे : जिल्हा बॅँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीच्या निषेधार्थ शनिवारी (दि.६) दुपारी निफाड तालुक्यातील दात्याणे येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी निदर्शने करीत बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Demonstrations in protest against forced repayment | सक्तीच्या वसुलीविरोधात दात्याणेत निदर्शने

सक्तीच्या वसुलीविरोधात दात्याणेत निदर्शने

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली करून मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप

कसबे-सुकेणे : जिल्हा बॅँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीच्या निषेधार्थ शनिवारी (दि.६) दुपारी निफाड तालुक्यातील दात्याणे येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी निदर्शने करीत बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असताना जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली करून मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी केला. दात्याणे येथे जिल्हा बॅँकेच्या वसुलीविरोधात आयोजित बैठकीत अहेर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, सुनील पवार, नारायण गुरगुडे, रमेश धनवटे, शिवाजी गुरगुडे, विलास पवार, संदीप जाधव, दीपक गुरगुडे, भास्कर गवळी, रामचंद्र दिवे, पंडित पवार, दौलत पवार, पुंजा गुरगुडे, किरण गवारे आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations in protest against forced repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक