जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:12 PM2020-01-07T19:12:20+5:302020-01-07T19:14:16+5:30

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृह व शिक्षकांच्या निवासस्थानावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब परिसरात निदर्शने करीत केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात घोषणाबाजी केली.

Demonstrations of 'Samyak' in Nashik in protest of JNU attack | जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने

Next
ठळक मुद्देजेएनयू हल्ला निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलननाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनची निदर्शने

नाशिक : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृह व शिक्षकांच्या निवासस्थानावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थीआंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब परिसरात निदर्शने करीत केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात घोषणाबाजी केली. 
 जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.7)गोल्फ क्लब परिसरात जय भीमचा जयघोष करीत केंद्र सरकार विरोधात ‘मोदी सरकार होश में आओं...’ अश घोषणाबाजी केली. यावेळी सम्यकच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व केंद्रातील मोदी सरकार विरोधी फलक हातात घेऊन जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करतानाच या हल्ल्यातील हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या निषेधार्ह हल्ल्याचे हिंदू महासभा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांसारख्या संघटनांनी समर्थन केल्याचा आरोप करीत अशा संघटनांना लोक शाहीत थारा नाही, त्यामुळे अशा संस्थांवर बंदी घालण्याची मागणीही यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी सम्यकचे जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव, तालुकाध्यक्ष दीपक पगारे, मिहीर गजभे, कोमल पगारे, दीपक दोंदो आदींनी या आंदोलनात सहभाग घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, शहरात सोमवारी विविध सघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनस्थळी कडक  बंदोबस्त तैनात केला होता.  
 

Web Title: Demonstrations of 'Samyak' in Nashik in protest of JNU attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.