शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:45 PM2020-12-30T23:45:48+5:302020-12-31T00:29:34+5:30

भांडवलदारांची उत्पादने व सेवांवर बहिष्कार टाकून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिटूच्या वतीने निदर्शने, आंदोलन करण्यात आले.

Demonstrations in support of the peasant movement | शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी निदर्शने

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी निदर्शने

Next

सातपूर : भांडवलदारांची उत्पादने व सेवांवर बहिष्कार टाकून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिटूच्या वतीने निदर्शने, आंदोलन करण्यात आले.       शेतकरीविरोधी तीन कायदे व कामगारविरोधी चार लेबर कोड मागे घेण्यात यावेत. प्रस्तावित वीजबिल रद्द करावे. पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ मागे घ्यावी यासाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू) च्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. डी.एल. कराड,  सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, कल्पना शिंदे, संजय पवार, विजया टिक्कल, मुकुंद रानडे, समाधान बागुल, समाधान भारतीय, आत्माराम डावरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrations in support of the peasant movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.