आयुक्तांवर फौजदारी कारवाईसाठी आज निदर्शने
By admin | Published: December 29, 2015 11:21 PM2015-12-29T23:21:56+5:302015-12-29T23:23:12+5:30
आयुक्तांवर फौजदारी कारवाईसाठी आज निदर्शने
नाशिक : किमान वेतन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक महापालिका श्रमिक सेवा संघाच्या वतीने बुधवारी (दि.३०) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तकार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
महापालिकेतील घंटागाडी कामगारांना २५ फेब्रुवारीपासून सुधारित किमान वेतन मंजूर झाले आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयाने तसे निर्देश महापालिकेला दिले आहेत. मात्र तरीही आयुक्तसुधारित वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे श्रमिक सेवा संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार सुधारित वेतन देण्याची कार्यवाही करावी आणि पालिका आयुक्तांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष महादेव खुडे यांनी कळविले आहे.