येवल्यात आदिवासी प्रश्‍नावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:21 PM2021-07-19T23:21:41+5:302021-07-20T00:32:25+5:30

येवला : आदिवासींच्या प्रश्‍नावर शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्थेच्या वतीने शहरातील विंचूर चौफुलीवर दीपक बर्डे, नितीन माळी, संभाजी बर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली.

Demonstrations on tribal issues in Yeola | येवल्यात आदिवासी प्रश्‍नावर निदर्शने

येवल्यात आदिवासी प्रश्‍नावर निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देगटविकास अधिकारी अन्सार शेख यांना निवेदन

येवला : आदिवासींच्या प्रश्‍नावर शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्थेच्या वतीने शहरातील विंचूर चौफुलीवर दीपक बर्डे, नितीन माळी, संभाजी बर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली.

आदिवासींना कसण्यासाठी जमीन देण्यात यावी, आदिवासींचे अतिक्रमण नियमित करून त्यांना त्यांच्या नावे जागेचा उतारा देण्यात यावा, उंदीरवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवा, यासह विविध मागण्यांसाठी शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने रास्ता रोकोऐवजी निदर्शने केली गेली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनात उंदीरवाडी, अंदरसुल येथील आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
 

Web Title: Demonstrations on tribal issues in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.