मालेगावी बसपाचे विविध मागण्यांप्रश्नी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:57 PM2021-07-13T16:57:22+5:302021-07-13T16:57:43+5:30
मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.
मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.
अनुसूचित जाती जमातीचे कर्मचाऱ्यांना पदोउन्नतीत आरक्षण कायम ठेवणे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात, खाद्य तेलाचे भाव कमी करावेत, वाढत्या महागाईला आळा घालण्यात यावा, कोरोना मुळे हातघाईस आलेल्या सर्व सामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करण्यात यावे, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यातील १०० टक्के प्राध्यापक भरती प्रचलित १०० बिंदू नामावली विषय विभाग निहाय व्हावी, कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांना शासन निर्णय प्रमाणे कायम आस्थापना सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात बसपाचे प्रदेश सचिव आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दीकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनिल पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार, आनंद जोगदंड, साईनाथ मगरे, अमोल निकम, उमर भाई, राजेश खरे,संजय जाधव, संतोष भोसले, संजय अहिरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मालेगावी विविध मागण्याप्रश्नी अपर जिल्हाधिकारी आवारात निदर्शने करताना बसपाचे आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दीकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनिल पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार आदी. (१३ मालेगाव बसपा)