शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:14 AM2018-06-23T00:14:33+5:302018-06-23T00:14:49+5:30

पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dengue-affected patients found in the city | शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

Next

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने तातडीने या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या दहा दिवसांत वडाळागावात सांधेदुखी व विषाणू तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविली तसेच डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधली असता ४६ घरांमध्ये एडिस डासाची उत्पत्ती आढळून आली.  त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न युद्धपातळी चालविला असतानाच पांडवनगरी परिसरात दोन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे ८० इमारती असून, दोन इमारतींदरम्यान मोठ्या प्रमाणात गाजर गवत व केरकचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी भूमिगत गटारींचे आणि शौचालयाच्या टाकीतील घाण बाहेर डबक्याच्या स्वरूपात साचले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने आरोग्य विभागाने संबंधित मिळकतधारकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे
हिरावाडीत नागरिक भयभीत
पंचवटी मलेरिया विभागाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियमितपणे औषध व धूरफवारणी केल्याचा दावा केला जात असताना हिरावाडीतील (भगवतीनगरला) डेंग्यूसदृश आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. डेंग्यूसदृश आजाराचे आढळलेले संशयित रुग्ण हे एकाच घरातील असून, ते कोणा एका अधिकाºयाचे नातेवाईक असल्याने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने तत्काळ रुग्ण आढळलेल्या संबंधित ठिकाणी जाऊन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. तसेच ज्या घरात रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत पाठविल्याचे समजते. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मनपाच्या संबंधित विभागाकडून केवळ मोजक्याच ठिकाणच्या भागात औषध व धूरफवारणी केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Web Title: Dengue-affected patients found in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.