डेंग्यू सातशे तर चिकुनगुन्या पाच शतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:50 AM2021-09-16T01:50:06+5:302021-09-16T01:51:27+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे वाढते रुग्ण मात्र डोकेदुखी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या १४ दिवसांत देान्ही आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचे १४० रुग्ण वाढल्याने ही संख्या सातशेच्यावर तर चिकुनगुन्याचे ९५ रुग्ण आढळल्याने हा आजार असलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३७ झाली आहे.
नाशिक- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे वाढते रुग्ण मात्र डोकेदुखी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या १४ दिवसांत देान्ही आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचे १४० रुग्ण वाढल्याने ही संख्या सातशेच्यावर तर चिकुनगुन्याचे ९५ रुग्ण आढळल्याने हा आजार असलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३७ झाली आहे. शहरात या दोन्ही डासांमुळे निर्माण होणाऱ्या आजाराची संख्या वाढत असताना दुसरीकडे महापालिकेत ठेकेदार पोसण्याच्या कारणातून वादंग सुरू आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट भयानक होती. नागरिक घरातूनही बाहेर पडत नव्हते. त्यामुळे रुग्णसंख्या कमी हेाती. यंदा मात्र पाच वर्षांतील विक्रम तोडणारी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये १३६२ संशयित रुग्णांचे नमुने तपासले होते. त्यात ३११ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले होते तर चिकुनगुन्याचे ७३० नमुने तपासण्यात आले त्यातील २१० जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता सप्टेंबर महिनाही तापदायक ठरला असून पंधरवाड्यातच संख्या प्रचंड वाढली आहे. चालू महिन्यात १०६४ तपासलेल्या रक्त नमुन्यांपैकी १४० जणांचे नमुने दूषित आढळले आहे तर चिकुन गुन्याच्या एकूण ६४७ पैकी ९५ रूग्ण आढळले आहे.
नाशिक शहरात सतत पाऊस पडत असेल तर अडचण नाही मात्र मध्येच पाऊस पडतो आणि मध्येच गायब हेात असल्याने नागरी वसाहतीत छतावर तसेच अन्यत्र डासांची उत्पत्ती वाढत आहे. महापालिकेचे तीसहून अधिक पथके सध्या रुग्णांच्या घरांची तपासणी करीत असून डासांची उत्त्पत्ती स्थाने नष्ट करतानाच बेदरकारपणे डासांची उत्पत्तीस्थाने तयार होण्यास पोषक वातावरण करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
इन्फो...
महापालिकेकडून पेस्ट कंट्रोलचे काम सुरू असले तरी हा ठेका मुळातच वादात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेविषयी नुकत्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्षेप घेतले आहे. आपल्या प्रभागातील अनेक नागरिकांना डेंग्यू-चिकुनगुन्या झाल्याचे सांगण्यात येत असून भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनाही डेंग्यू झाल्याचे वृत्त आहे.
इन्फो..
पाच वर्षांतील रुग्णसंख्या (जानेवारी ते सप्टेंबर)
वर्ष डेंग्यू चिकनगुनिया
२०१७ १५१ ४
२०१८ ३६८ ४०
२०१९ १७७ १
२०२० ११५ ७
२०२१ ७१७ ५३७