डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:05 PM2017-10-02T23:05:41+5:302017-10-02T23:05:46+5:30

जायखेडा : येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गावातील गौतम चिंतामण गायकवाड (१४) या मुलाचा तापाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. गावातील वाढती अस्वच्छता व उपाययोजनांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथीचे आजार पसरत असल्या

Dengue-infected child's death | डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

googlenewsNext

जायखेडा : येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गावातील गौतम चिंतामण गायकवाड (१४) या मुलाचा तापाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. गावातील वाढती अस्वच्छता व उपाययोजनांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथीचे आजार पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील वाढत्या साथीच्या आजारांना ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप करीत सोमवारी सकाळी गावातील शेकडो संतप्त स्त्री-पुरु ष नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जमून ग्रामविकास अधिकाºयास घेराव घालून जाब विचारला व स्थानिक लोकप्रतिनिधींनाही चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, ७ आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव संतप्त ग्रामस्थांकडून यावेळी मांडण्यात आला.
गेल्या काही दिवसांत डेंग्यूसदृश आजाराने जायखेडा गावात थैमान घातले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सर्व वयोगटातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. डास निर्मूलन व स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध आजारांचे रुग्णगेल्या काही दिवसांपासून गावात थंडी, ताप, पेशी कमी होणे, अंगदुखी, सर्दी, खोकला आदी आजारांच्या रु ग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही रु ग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर अनेक रु ग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, अनेकांना तातडीच्या उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे जिवाच्या धोक्याबरोबरच हजारो रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन, जनजागृतीबरोबरच डास निर्मूलन मोहीम व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Dengue-infected child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.