खासगी रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:33 AM2018-09-12T01:33:18+5:302018-09-12T01:33:25+5:30
कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे.
इंदिरानगर : कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे.
महापालिका पूर्व विभागाच्या वतीने वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता रमेश निंबारे, नितीन अहिरे, संतोष बागुल या कर्मचाºयांनी मंगळवारी ११ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कमोदनगर येथील श्रीयश हॉस्पिटलच्या गच्चीवर जाऊन तपासणी केली असता तीन वेगवेगळ्या ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्या तातडीने नष्ट केल्या. त्या जर नष्ट झाल्या नसत्या तर त्यातून डासांची उत्पत्ती होऊन परिसरात डेंग्यू, चिकुनगुन्या यांसारख्या रुग्णांची संख्या वाढली असती, असे मनपा अधिकाºयांनी सांगितले. रुग्णांवर उपचार करणाºया रुग्णालयाच्या गच्चीवरच डासांच्या अळ्या सापडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.