डेंग्यू, हिवताप आजारांची साथ

By Admin | Published: August 28, 2016 10:54 PM2016-08-28T22:54:54+5:302016-08-28T23:04:33+5:30

चांदवड : काळजी घेण्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

Dengue, malaria with sickness | डेंग्यू, हिवताप आजारांची साथ

डेंग्यू, हिवताप आजारांची साथ

googlenewsNext

 चांदवड : शहरात अलीकडच्या काळात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया व हिवताप या आजारांचा समावेश
आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उसवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय व पंचायत समिती चांदवडतर्फे व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवकांमार्फत शहरामध्ये साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी दैनंदिन गृहभेटी व कंटेनर सर्वेक्षणची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे डास अळ्या आढळून येणाऱ्या भांड्यामध्ये, पिंपात व सांडपाणी साचून राहिलेल्या ठिकाणी अ‍ॅबेट (टेलिफॉस)चे अळीनाशक द्रावण टाकले जात आहे. अनेक घरांवरील टायर्स काढले जात आहेत, तर दूषित पाणी फेकून दिले जात आहे; मात्र काही नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी पाणी फेकण्यावरून व औषधे टाकण्यावरून वाद घालत आहेत. जनतेने वाद न घालता आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व डॉ. प्रदीप जायभावे यांनी केले आहे. माहितीपत्रकाचे वाटप केले जात आहे. डासांची पैदास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने साथीच्या आजारांवर निर्बंध घालता येतील.
(वार्ताहर)

Web Title: Dengue, malaria with sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.