डेेंग्यूचे दीड शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:18 AM2018-09-05T01:18:49+5:302018-09-05T01:19:02+5:30
नाशिक : शहरात पावसामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून, गेल्या महिन्यात डेंग्यूचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले असून, चिकुनगुण्याच्या रुग्णांची संख्या चाळीसवर पोहोचली आहे.
नाशिक : शहरात पावसामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून, गेल्या महिन्यात डेंग्यूचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले असून, चिकुनगुण्याच्या रुग्णांची संख्या चाळीसवर पोहोचली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यू आणि चिकुनगुण्याची साथ पसरते. यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत १ हजार १३३ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले असून, त्यात आत्तापर्यंत ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात १४८ रुग्ण आढळले. आत्तापर्यंत डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची महापालिकेत नोंद नाही. मात्र, स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत दोन रुग्ण दगावले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून आत्तापर्यंत १७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हेदेखील महापालिकेसमोर आव्हान ठाकले आहे. याशिवाय चिकुनगुण्याचे आत्तापर्यंत ४० रुग्ण आढळले असून, त्यापैकी २१ रुग्ण गेल्या महिन्यात आढळले आहेत. विशेषत: डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी एक लाख प्रबोधन पत्रे वाटण्यात आली आहेत. डासांची निर्मिती होत असलेल्या व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला आला आहे. महापालिकेच्या वतीने डास निर्मूलन फवारणी केली जाते. त्याचबरोबर घरांची तपासणी केली असता आजूबाजूच्या घरांमध्येच डास आढळतात. त्यामुळे महापालिकेने आता डासांची उत्पत्ती स्थळे ज्या घरात आढळतील, तेथे प्रति ठिकाण पाचशे रुपये दंड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.