उमराणेत चिकुनगुनियासह डेंग्यूची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:43+5:302021-07-29T04:14:43+5:30
उमराणे : गेल्या महिनाभरापासून उमराणे येथे चिकुनगुनिया व डेंग्यूची साथ सुरू असून, दिवसेंदिवस या साथीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ...
उमराणे : गेल्या महिनाभरापासून उमराणे येथे चिकुनगुनिया व डेंग्यूची साथ सुरू असून, दिवसेंदिवस या साथीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे डास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून संपूर्ण गावात धूर फवारणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची भीती असतानाच गेल्या महिनाभरापासून चिकुनगुनिया व डेंग्यू या साथरोगांनी डोके वर काढले आहे. या साथींच्या आजारामुळे बहुतांशी नागरिक त्रस्त झाले असून ग्रामीण रुग्णालय व खाजगी दवाखान्यांत उपचारासाठी गर्दी दिसून येत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू असतानाच ग्रामपंचायत प्रशासनानेही पुढाकार घेत संपूर्ण गावात, तसेच आदिवासी वाड्या-वस्त्यांवर डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली जात आहे.
कोट....
गेल्या महिनाभरापासून डेंग्यू व चिकुनगुनियाची साथ सुरू होताच आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली जात असून, नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाळावा. आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. - सौ. कमलताई देवरे, सरपंच, उमराणे
फोटो - २८उमराणे१
उमराणे येथील एकलव्य आदिवासी वस्तीत डास प्रतिबंधात्मक फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी.
280721\28nsk_16_28072021_13.jpg
फोटो - २८उमराणे हेल्थउमराणे येथील एकलव्य आदिवासी वस्तीत डास प्रतिबंधात्मक धुरळणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी.