डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:48 AM2017-10-16T00:48:18+5:302017-10-16T00:48:23+5:30
सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाण्याची डबकी साचली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येथील प्रभाग क्रमांक २८मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाण्याची डबकी साचली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येथील प्रभाग क्रमांक २८मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सिडको प्रभाग २८मध्ये नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक मटाले, सुवर्णा मटाले यांनी दीपावलीनिमित्त प्रभागात फिरून नागरिकांना भेडसावणाºया नागरी समस्यांबाबत पाहणी करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच प्रभागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्या आढळून आल्याने याबाबत नगरसेवकांनी महापालिकेला कळविले.
प्रभागात ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला असल्याने त्याची मनपाने त्वरित मार्गी लावण्यात यावे याबाबत सांगितले. प्रभागातील शुभमपार्क, गौरव कॉलनी या भागांतील अंबड लिंकरोडमधील विविध वसाहतींना यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी भेटी देऊन तसेच प्रभाग स्वच्छ ठेवावा याबाबतही नागरिकांना आवाहन केले.
दरम्यान, सिडकोतील उत्तमनगर, पवननगर आदी भागांत डासांचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणी तसेच धूर फवारणी करण्यात यावी, अशी सिडको परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे. धूर, औषध फवारणीची गरजप्रभागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रूग्ण आढळले असून, ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे. परंतु याबाबत मनपाकडून दखल घेतली जात नसल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. मनपाने नियमित धूर व औषध फवारणी करण्याची गरज असल्याचेही यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले.
दिवाळीचा सण असल्याने घरोघरी साफसफाई केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. परंतु अनेक भागांत घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने काहीजण रस्त्यालगतच कचरा टाकतात.