दंतवैद्यकशास्त्राला हवी आधुनिकतेची जोड : डॉ. सुरेश मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:56 PM2018-09-01T16:56:20+5:302018-09-01T16:58:50+5:30
व्यासपीठावर डॉ. गिरीश नगरकर, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश रोरा, डॉ. रुपेश दुग्गड, डॉ. महेश देवरे, नाशिक चे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उमेश महाजन आदी उपस्थित होते.
नाशिक : काळानुरूप समाजात दंतविकार व मुखरोग वाढीस लागत आहे. याला बदलती जीवनशैली व आहारशैली कारणीभूत ठरत आहे; मात्र आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान विकसित होत असल्याने दंतवैद्यकशास्त्रही वेगाने प्रगती करत आहे. दंत वैद्यकांनी आपल्या दैनंदिन सरावात डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशनचे महाराष्टप्रदेश अध्यक्ष डॉ. सुरेश मेश्राम यांनी केले.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी (दि.१) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मेश्राम बोलत होते. व्यासपीठावर डॉ. गिरीश नगरकर, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश रोरा, डॉ. रुपेश दुग्गड, डॉ. महेश देवरे, नाशिक चे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उमेश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी मेश्राम म्हणाले, दंतवैद्यकशास्त्र आधुनिक होत असून, वेगाने प्रगती करत आहे. यामुळे दंत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीदेखील त्यानुसार स्वत:ला अद्ययावत करण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन आयडीएच्या वतीने अशा पद्धतीच्या परिषदेचे आयोजन करण्यावर भर दिला जातो. या परिषदेमध्ये सहभागी तज्ज्ञांकडून प्रगत व आधुनिक दंतवैद्यकशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेतून डॉक्टरांचे ज्ञान अद्ययावत होऊन आधुनिक उपचारपद्धतींद्वारे समाजाला गुणवत्तापूर्ण सेवा देता येण्यास मदत होईल.
उद्घाटन सत्रात डॉ. अजित शेट्टी, डॉ. विशाल गुप्ता, डॉ. मंदार पिंप्रीकर यांनी अनुक्रमे फुल माऊथ रिहॅबिलिटेशन, कम्पोसिट रिस्टोरेशन, प्रिडेक्टिेबल इनडॉन्टिक्स या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेच्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामुग्री व साहित्य-वस्तूंचे प्रदर्शन मोफत मांडण्यात आले होते. या परिषदेला उत्तर महाराष्टÑातून सुमारे पाचशेहून अधिक दंतवैद्यकांनी सहभाग नोंदविला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा नाशिक शाखेला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाला.