देवळा : तालुक्यात काही भागात केवळ रिमझिम

By admin | Published: August 8, 2016 11:16 PM2016-08-08T23:16:38+5:302016-08-08T23:17:00+5:30

पोळ कांद्याच्या लागवडीस प्रारंभ

Deola: Only in some areas in the taluka | देवळा : तालुक्यात काही भागात केवळ रिमझिम

देवळा : तालुक्यात काही भागात केवळ रिमझिम

Next

देवळा : नाशिक जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होऊन नद्या-नाले दुधडी भरून वाहत असताना देवळा तालुक्यात खामखेडा, विठेवाडी, भऊर आदि गावांचा अपवादवगळता पावसाचे प्रमाण तसे कमीच आहे. कांदा लिलावासंदर्भात व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये योग्य तोडगा निघत नसल्यामुळे चाळींमध्ये साठविलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा आता सडण्यास सुरुवात झाल्याने मोठा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, तालुक्यातील अत्यल्प पावसाचा लाभ घेत तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर पोळ कांद्याची लागवड सुरू झाली आहे.
शासनाने अडतबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केले होते. पण नंतर व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये लिलावासंदर्भात गोणी पद्धतीवरून वाद निर्माण झाला. अद्यापपर्यंत त्यावर योग्य तोडगा निघू शकणार नाही. दरम्यान महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लिलाव होऊ शकले नाहीत. तुरळक शेतकऱ्यांनी गोणी पद्धतीने आपला कांदा विक्रीसाठी आणला; परंतु या गोणी पद्धतीत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत असल्याने शेतकरी या पद्धतीला प्रखर विरोध करीत आहेत.
यामुळे हजारो क्विंटल कांदा चाळींमध्ये पडून असल्याने शेतकरीवर्ग आगामी खरिपातील पोळ कांदा लागवडीकडे फारसा उत्साह दाखविणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु देवळा तालुक्याच्या पूर्वभागातील मेशी, दहिवड, डोंगरगावपासून रण्यादेवपाडे, विजयनगर, महालपाटणे, उमराणे आदि गावांमध्ये पोळ कांद्याची लागवड सुरू झाली आहे. पोळ कांद्याची रोपे लागवड योग्य झाल्याने ती खराब होऊन वाया जाऊ नयेत यासाठी कांदा लागवड शेतकऱ्यांना करावी लागत असून, या लागवडीसाठी येणऱ्या खर्चासाठी भांडवल उभे करताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कांदा लिलाव प्रचलित पद्धतीने केव्हा सुरू होतात याकडे नजरा लाऊन बसले आहेत.

Web Title: Deola: Only in some areas in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.