देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 09:14 PM2021-07-18T21:14:16+5:302021-07-19T00:18:28+5:30

देवळा : देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये अनिकेत काळे तर जिजामाता विद्यालयात वैष्णवी निकम व सृष्टी शिंदे प्रथम क्रमांक पटकावला.तालुक्यात ४३ विद्यालयांचे २ हजार ४५५ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ होते व सर्व उत्तीर्ण झाले. त्यातील १ हजार ३९७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले तर ९९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली.

Deola taluka's 10th result is 100 percent | देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के

देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के

Next
ठळक मुद्दे श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये अनिकेत काळे प्रथम आला.

देवळा : देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये अनिकेत काळे तर जिजामाता विद्यालयात वैष्णवी निकम व सृष्टी शिंदे प्रथम क्रमांक पटकावला.तालुक्यात ४३ विद्यालयांचे २ हजार ४५५ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ होते व सर्व उत्तीर्ण झाले. त्यातील १ हजार ३९७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले तर ९९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली.

येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. अनिकेत काळे हा विद्यार्थी (९४.४०) विद्यालयात प्रथम आला. सिद्धेश थोरात (९४.२०) द्वितीय. प्रीतम आहेर (९३.६०) तृतीय आला. आयुष पगार व आदित्य शिंदे हे दोघे (९१.००) चौथे आले, तर श्रीमंत मराठे (९०.८०) पाचवा आला.
जिजामाता कन्या विद्यालयात वैष्णवी निकम व सृष्टी शिंदे यांनी (९८.६०) प्रथम क्रमांक पटकावला. नैनिका जाधव (९७.२०), प्रांजल थोरात व मानसी जगताप (९६.६०) हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, सचिव गंगाधर शिरसाठ, मुख्याध्यापक डी. इ. आहेर, मुख्याध्यापिका श्रीमती मोरे व शिक्षकांनी कौतूक केले.

Web Title: Deola taluka's 10th result is 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.