देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:00 PM2019-04-03T23:00:40+5:302019-04-03T23:00:55+5:30

नाशिक : देवळाली कॅम्प येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएमधून वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर करून दोन लाखांची रोकड काढून फसवणूक केली.

At Deolali ATM, two lakhs have been delayed | देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले

देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले

Next
ठळक मुद्दे वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर

नाशिक : देवळाली कॅम्प येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएमधून वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर करून दोन लाखांची रोकड काढून फसवणूक केली.
श्री रेणुकामाता देवी मंदिर येथील पंचदीप रेणुका माता सोसायटी येथे राहाणारे वयोवृद्ध बाळकृष्ण मुरलीधर पाटील (६२) भामट्याने एटीएम कार्ड घेऊन बनावट एटीएम कार्ड त्यांना दिले. ५ ते ११ मार्च दरम्यान पाटील यांचे एटीएम कार्डचा वापर करून आनंदरोड स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून २ लाख ८ हजार रुपयांची रोकड काढून फसवणूक केली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० हजारांचे दागिने लंपास
बिटको महाविद्यालय पाठीमागील जगताप मळा येथे बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जगताप मळा डायनेस्टी सोसायटी येथे दीपक दत्तात्रय सामरे यांचा फ्लॅट बंद स्थितीत आहे. २३ मार्च ते १ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटचा मुख्य दरवाजा व सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील डब्यात ठेवलेले २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे व अंगठ्या चोरून नेल्या.

Web Title: At Deolali ATM, two lakhs have been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.