नवरात्रोत्सवासाठी देवळाली, भगूर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:35 AM2019-09-26T00:35:52+5:302019-09-26T00:44:12+5:30
नवरात्रोत्सवासाठी देवळाली सज्ज झाली असून, रेस्ट कॅम्परोडवर भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व जागृत देवस्थान मानले जाणाºया रेणुकादेवी माता मंदिराच्या बारव स्वच्छतेचे काम पूर्णत्वास आले आहे.
देवळाली कॅम्प : नवरात्रोत्सवासाठी देवळाली सज्ज झाली असून, रेस्ट कॅम्परोडवर भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व जागृत देवस्थान मानले जाणाºया रेणुकादेवी माता मंदिराच्या बारव स्वच्छतेचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच लॅमरोडवरील माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी माता मंदिरातील मूर्तीला रंगकाम करण्याचे काम जोमाने सुरू असून, यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
रेणुका माता मंदिरातील देवीच्या मूर्तीची स्थापना पुरातन काळातील भृगूऋषी यांनी केल्याची आख्यायिका आहे. या मंदिरासमोर असणारे पाण्याचे बारव त्वचारोगापासून मुक्ती देणारे म्हणून प्रसिद्ध असल्याने भाविकांची येथे गर्दी असते. नवरात्रोत्सवासाठी मंदिरासमोर मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. महिला व पुरु ष दर्शन रांगांची सोय व परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नऊ दिवस घटी बसणाºया महिलांसाठी मंदिराच्या मागील बाजूतील सभागृहात निवासाची सोय करण्यात आल्याची माहिती पुजारी प्रभाकर चिंगरे यांनी दिली. तसेच देवीच्या मूर्तीला रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
रेस्ट कॅम्प रोडच्या वर्कशॉपपासून देवी मंदिरापर्यंतच्या परिसरात स्वच्छता मोहीम बोर्ड प्रशासनाने आधीच हाती घेतली आहे. यासोबत मंदिरासमोर असणाºया बारवची स्वच्छता करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाºया भाविकांचा ओघ लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपाचे महिला व पुरु ष असे स्वतंत्र वस्त्रांतरगृह उभे करण्यात येणार आहे. दरवर्षी या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने मंदिर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
रविवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून भाविक त्वचारोगापासून मुक्ती मिळावी या श्रद्धेने स्नान करण्यासाठी मंगळवार व शुक्र वार तसेच पौर्णिमा या दिवशी भेट देत असतात. मात्र त्वचारोगापासून मुक्ती देणाºया बारवची अनेक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य तर पाण्यात बारीक जीवजंतूंचा प्रादुर्भाव वाढला होता. नवरात्रोत्सव लक्षात घेता याठिकाणी येणाºया भाविकांकडून या पवित्र बारवची स्वच्छता करण्याची मागणीदेखील जोर धरू लागली होती.