देवळाली कॅम्पला दवाखाना फोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:01 PM2020-07-27T19:01:26+5:302020-07-27T19:01:55+5:30

चोरट्यांनी आता घरांऐवजी कारखाने, गुदामे, दुकाने, दवाखाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

Deolali camp was dismantled and literature was destroyed | देवळाली कॅम्पला दवाखाना फोडून साहित्य लंपास

संग्रहित छायाचित्र

Next

नाशिक : शहर व परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांनी नागरिक संतप्त झाले आहे. चोरट्यांनी आता घरांऐवजी कारखाने, गुदामे, दुकाने, दवाखाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी एक दवाखाना फोडून लॅपटॉपसह धातूची गणेशमुर्ती, दिवे लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, चोरट्यांनी येथील डॉ. मेहक विनोद चावला यांचे डेन्टल क्लिनिकला लक्ष्य केले. गुरूद्वारारोडवरील चावला कॉटेज येथे असलेला त्यांचा दवाखाना चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडला. क्लिनीकमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी लॅपटॉपसह अडीच किलो वजनाची गणपतीची पितळाची धातूची मुर्ती व दिवा असा सुमारे २७ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार पाडवी करीत आहेत.
आडगावला ८० हजारांची घरफोडी
नाशिक : नांदूरनाका लिंकरोड वरील इच्छामणी नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुषण भाऊसाहेब राहणे (रा. शांताबाई निवास) यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. राहणे कुटूंबिय १९ ते २६ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ४५ हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिणे असा ८० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
 

Web Title: Deolali camp was dismantled and literature was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.