देवरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी रंजना भगत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 07:21 PM2019-06-12T19:21:47+5:302019-06-12T19:22:36+5:30

जळगाव नेऊर : देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविनर्वाचित सरपंच परीघाबाई सालमुठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत रंजना भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

Deorgaon Gram Panchayat, Deputy Chief Minister, Ranjana Bhagat unopposed | देवरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी रंजना भगत बिनविरोध

देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना भगत यांच्या निवडीनंतर सत्कार करताना शिवसेनेचे संजय सालमुठे व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्दे रंजना भगत यांचा एकमेव अर्ज

जळगाव नेऊर : देवरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविनर्वाचित सरपंच परीघाबाई सालमुठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत रंजना भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
प्रथमच जनतेतून सरपंच निवड झाल्याने आता उपसरपंच कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते, अत्यंत चुरशीची निवडणुक होऊन तसेच गाव नात्यागोत्याचे असल्याने सरपंच निवड जनतेतून झाल्याने उपसरपंच निवडीसाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात शिवसेना गटप्रमुख संजय सालमुठे व युवा नेते गुड्डु गोराडे यांच्या नेतृत्वाखाली रंजना भगत यांची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी सदस्य शंकर कोंढरे, विठ्ठल सालमुठे, सोपान लोखंडे, जन्याबाई ठाकरे, शोभाबाई लोखंडे, सोनाली डांगे, माधुरी गव्हाणे, विठाबाई भवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रभान गोराडे, भास्कर कोंढरे, कचरु सालमुठे, कालिचरण जाधव, साहेबराव डांगे, उत्तम ठाकरे, जगन भवर, विठ्ठल गव्हाणे, साहेबराव दाभाडे, जयवंत लोखंडे, बाबा डांगे, काशिनाथ भगत, पुंडलिक गव्हाणे, विष्णू भगत, म्हसु लोखंडे, नामदेव ठाकरे, शिवाजी गव्हाणे, संपत लोखंडे, गंगाधर सालमुठे, सुदाम लोखंडे, माधव ठाकरे, काशिनाथ देवकर, त्र्यंबक लोखंडे, भानुदास सालमुठे, खंडु लोखंडे, दिलीप लोखंडे, कारभारी गव्हाणे, सिताराम लोखंडे, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ उगले, दत्तु लोखंडे, राजेंद्र ठाकरे, मनोज डांगे, प्रभाकर गव्हाणे, पुंजाराम भगत, प्रविण भगत आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणुक निर्णायक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नागरे, तलाठी औंदकर व ग्रामसेवक भरत रिकबे यांनी सहकार्य केले. निवडी नंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
 

Web Title: Deorgaon Gram Panchayat, Deputy Chief Minister, Ranjana Bhagat unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.