देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:38 PM2018-12-29T17:38:38+5:302018-12-29T17:39:48+5:30

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांडताना व्यक्त केले.

Deos has organized the Zilla Parishad President's Trophy Center level competition in the center | देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

 देवसाने केंद्र स्तरीय स्पर्धांच्या उदघाटन कार्यक्र म प्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. सोनार.

Next
ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांडताना व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी केंद्राचे बीट विस्तारअधिकारी के. पी. सोनार, केंद्रप्रमुख ए. टी. गायकवाड, सरपंच पंढरीनाथ भरसट, शा. व्य. समिती अध्यक्ष गवळी तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक, महिला व केंद्रातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. जि प शाळा करंजाळी (देवपाडा) स्पर्धेचे आयोजक होती. सूत्रसंचलन अनुराधा तारगे, अंबादास चौधरी यांनी केले. स्पर्धांचे नियोजन गुलाब दातीर, शिवाजी पवार यांनी पार पाडले. विस्तार अधिकारी सोनार, केंद्रप्रमुख गायकवाड यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 
वक्तृत्व - प्रथम - काजल माळेकर, द्वितीय - पल्लवी जोपळे, तृतीय - मोहित गवळी करंजाळी चित्रकला - प्रथम- सविता सताळे करंजाळी गा ,द्वितीय - माणिक गायकवाड देवसाने, तृतीय - भरत शेवरे रानपाडा. धावणे २०० मी (मुले) - प्रथम-उद्धव गायकवाड करंजाळी, द्वितीय-चंद्रशेखर वाघ चारणवाडी, तृतीय - कृष्णा गांगोडे सारसाळे धावणे १०० मी (मुली) -प्रथम - धनश्री तुंगार करंजाळी गा, द्वितीय - कल्पना गायकवाड मोरवनपाडा, तृतीय - कांचन गवळी रानपाडा. वैयक्तिक गायन - प्रथम - चंद्रशेखर वाघ चारणवाडी, द्वितीय-पवन गायकवाड करंजाळी, तृतीय - दुर्गा गुंबाडे मोरवनपाडा , वैयक्तिक नृत्य - प्रथम - पल्लवी जोपळे शिंदपाडा, द्वितीय- देवसाने, तृतीय - करंजाळी गा सामूहिक गायन - करंजाळी पाडा, करंजाळी गा, देवसाने. सामूहिक नृत्य - प्रथम - देवसाने, द्वितीय - शिंदपाडा, तृतीय-करंजाळी गा. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 

Web Title: Deos has organized the Zilla Parishad President's Trophy Center level competition in the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.