भालूर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:39 PM2020-01-13T22:39:05+5:302020-01-14T01:14:02+5:30
भालूर येथून त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.दिंडी सोहळ्याचे हे सलग १२ वे वर्ष असून असंख्य भाविक हरिनामाचा जप करत श्रीनिवृत्तीनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.
मनमाड : भालूर ता: नादंगाव येथून त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.दिंडी सोहळ्याचे हे सलग १२ वे वर्ष असून असंख्य भाविक हरिनामाचा जप करत श्रीनिवृत्तीनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.
२० जानेवारीला होणाऱ्या संत निवृत्त्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी ह.भ.प. कैलास महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकवई,निळखेडे, विंचूर,निफाड,शिंपी टाकळी फाटा, औरंगाबाद नाका नाशिक,पिंपळगाव आदी ठिकाणी ७ दिवस मुक्काम करत १९ तारखेला दिंडी त्र्यंबकेश्वर मुक्कामी पोहोचणार आहे. दु:खमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी असंख्य भाविक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी ह.भ.प. गोरख महाराज लहिरे, परशराम घोडके, विठ्ठल आहेर, भागवत पाटील, साईनाथ जटार, विठ्ठल सोमासे, सुखदेव आरसुळे आदी उपस्थित होते.