रिक्त पदांवर भरतीसाठी विभागीय शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:28 AM2018-12-05T02:28:14+5:302018-12-05T02:29:02+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेतर्फे मंगळवारी (दि.४) जेवणाच्या सुट्टीत कर्मचाºयांनी मंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेतर्फे मंगळवारी (दि.४) जेवणाच्या सुट्टीत कर्मचाºयांनी मंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले.
आस्थापनेतील रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी दि. १५ नोव्हेंबरपासून संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघटनेने केला आहे. रिक्त पदांवर भरतीसाठी विभागीय शिक्षण मंडळ कर्मचाºयांचे आंदोलन शिक्षण मंडळाच्या राज्यभरातील नऊ विभागीय मंडळ कार्यालयांसह व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ ची सुमारे २५० कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. या सर्व पदांवर तत्काळ भरतीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी कर्मचारी महासंघटनेने दि. १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करताना आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी संघटनेने १ डिसेंबरपासून काळी फित लावून काम करतानाच जेवणाच्या सुटीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजीच्या माध्यमातून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. अशाप्रकारे १६ डिसेंबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचेही यावेळी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. कर्मचारी महासंघटनेच्या माध्यमातून रिक्त पदांवर भरतीसाठी संपूर्ण राज्यभरात असेच आंदोलन होत असून, नाशिकमध्ये या आंदोलनात कर्मचारी महासंघटनेचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांच्यासह सरचिटणीस शालिग्राम चव्हाण, दिनकर पाटील, योगेश नाईक, कैलास नागपूर, दिनेश मुसळे, गणेश कस्तुरेस, अक्षय शहा आदींसह संघटना कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
३१ डिसेंबरला सामूहिक रजाकर्मचाºयांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर १७ डिसेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्यासह जेवणाच्या सुटीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी, अधिक च्या कामासाठी अनुपस्थित राहणे, कार्यालयीन कामासाठी कार्यालयाबाहेर, बाहेरगावी न जाणे, शासकीय नियमानुसार कार्यालयीन वेळेतच उपस्थित राहत आंदोलनात्मक पवित्रा कायम ठेवण्याचा निर्धार कर्मचारी महासंघटनेने घेतला आहे. त्यानंतरही भरतीप्रक्रियेविषयी सकारात्मक निर्णय झाला नाही तर ३१ डिसेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देतानाच चौथ्या टप्प्यात दि. १ ते १५ जानेवारीपर्यंत पुन्हा काळी फित लावून काम करतानाच घोषणा देणे, प्रथम सत्रात एक तास उशिरा कामावर उपस्थित राहून आंदोलन सुरूच ठेण्याचा निर्धार कर्मचारी महासंघटनेने व्यक्त केला आहे.