विभागीय अधिकाऱ्यांचा दणका ; उशिराने कामावर हजर झाल्यास पगार कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:40 AM2018-12-13T00:40:39+5:302018-12-13T00:40:57+5:30
महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक सिडको भागातील कर्मचा-यांच्या हजेरीशेडवर जाऊन पाहणी केली.
सिडको : महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक सिडको भागातील कर्मचा-यांच्या हजेरीशेडवर जाऊन पाहणी केली. यात सुमारे १६ कर्मचारी हे उशिराने कामावर आल्याचे लक्षात आले असून, या कर्मचाºयांना तंबी देत यापुढील काळात उशिराने कामावर हजर झाल्यास पगार कपात करणार असल्याचे सांगतले. यातील दोन कर्मचाºयांना नोटीस बजाविण्यात आल्याचे समजते.
तत्कालीन मनपा आयुक्तांच्या काळात सर्व ठिकाणी सफाई कर्मचारी दिसत होते; मात्र त्यांची बदली होताच कर्मचारी दिसेनासे झाले असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यामुळे रस्त्यांवर पुन्हा कचरा दिसू लागल्याने याबाबात नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. नवीन आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनीदेखील कामकाजात कसूर करणाºयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. तसेच आयुक्तांनी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना सूचित केले असून, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे आपले कर्तव्य असून, यात कोणीही कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी बुधवारी (दि. १२) सकाळी सहा वाजता अचानक सिडको भागातील सफाई कर्मचाºयांच्या हजेरीशेडवर व्हिजिट मारली. यावेळी त्यांना सुमारे १६ कर्मचारी उशिराने हजर झाल्याचे निदर्शनास आले. अधिकाºयांनी या सर्वांची झाडाझडती घेतली व यातील दोन कर्मचारी हे उशिराने कामावर येत असल्याने त्यांना नोटिसा बजाविल्या. यावेळी प्लॅस्टिकचा वापर करणाºया दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंडदेखील करण्यात आला आहे.
दंडात्मक कारवाईच्या सूचना
विभागीय अधिकाºयांनी सकाळी हजेरीशेडवर पाहणी केल्यानंतर शिवाजी चौक भाजी मार्केटमध्ये पाहणी केली असून, भाजी विक्रे ते हे त्यांना सांगितलेल्या जागेवर न बसता दुसरीकडेच बसत असल्याने त्यांना सूचना केल्या. तसेच परिसरात घाण व कचरा टाकू नये याबाबत प्रबोधन केले. याबाबत रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे, अस्वच्छता पसरविणे, रस्त्यावर पाणी सांडणे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. याप्रकरणी नियमितपणे दक्षता घेऊन कामकाज करण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.