Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:42 AM2021-07-19T07:42:21+5:302021-07-19T07:42:58+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली.
नाशिक - आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली.
तत्पूर्वी आज पहाटे निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर भर पावसात विठ्ठलाच्या आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयघोषात भजन कीर्तन करून समाधी मंदिरात पादुका नेण्यात आल्या आणि त्यानंतर पालखी बस मधून रवाना झाली.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान pic.twitter.com/AVejHkbRmZ
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021
यंदा दोन बस मधून ४० वारकऱ्याना परवानगी असून त्यामुळे मानकरी मोहन महाराज बेलापुरकर तसेच बाळकृष्ण डावरे यांच्यासह प्रशासकीय समितीचे सदस्य रवाना झाले.