मढी पदयात्रेसाठी आज प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:21 PM2020-03-08T23:21:22+5:302020-03-08T23:23:41+5:30

सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Departure today for Madi Hiking | मढी पदयात्रेसाठी आज प्रस्थान

सिन्नर तालुक्यातील वावी येथे कानिफनाथ रथाचे पूजन करताना भाविक.

Next
ठळक मुद्देदिंडी सोहळा : वावीत रथपूजन व मिरवणूक उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरतो. या यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून होळी (धुलीवंदन) ते रंगपंचमी या काळात पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला भरणाºया यात्रेसाठी येथून सुमारे ७०० हून अधिक नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत जाणाºया या पदयात्रेसाठी तयारी झाली आहे.
रविवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी (दि. ९) दुपारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन काठीला कळसाचे दर्शन घडवून आणले जाते. या पदयात्रेच्या समितीने मढी (ता. पाथर्डी) येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त जाऊन विसावतात. या पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथपूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात येते. सोमवारपासून निघणाºया या पदयात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेत भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.समाधी मंदिर चार दिवस खुलेभटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस चालतो. यात्रोत्सवास होळीपासून प्रारंभ होतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठा यात्रोत्सव भरतो. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी समाधी मंदिरात जाऊन भाविकांना दर्शन घेता येत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांमुळे गर्दी होते. त्यामुळे भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे, यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. गुढीपाडव्याच्या काळात समाधी मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Web Title: Departure today for Madi Hiking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.