निराधार योजनेतील प्रकरणे पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:16 AM2019-12-10T00:16:13+5:302019-12-10T00:16:37+5:30
ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
नाशिक : ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक व निराधारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र जिल्हापातळीवर लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक दिव्यांतून जावे लागते. प्रशासकीय गतिमानता आली असल्याचे सांगितले जात असताना योजनांच्या कागदपत्रांचा प्रवास मात्र संथगतीने सुरू असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.
संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेची निराधारांची प्रकरणे मागील एक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. ही प्रकरणे मार्गी लागत नसल्याने लाभार्थ्यांची परवड होत आहे. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (ए) वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत विधवा, घटास्फोटीत, दिव्यांग, वृद्ध, निराधारांना उदरनिर्वाहासाठी दरमहा ठाराविक पेन्शन दिली जाते, मात्र त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप रिपाइंकडून करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक व निराधारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने मदतीसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेंतर्गत विधवा, घटास्फोटीत, दिव्यांग, वृद्ध, निराधारांना उदरनिर्वाहासाठी दरमहा ठाराविक पेन्शन दिली जाते. पेन्शन मिळावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रकरणे प्रलंबित आहे. गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभच दिला जात नाही. त्यामुळे ही प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढत गरजूंना पेन्शन सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला.